
टू २
01276
‘सत्याच्या अनुभूतीनंतर कविता प्रसवते’
सरुड ः कविता कवीच्या अंतःकरणातून प्रकटते. सत्याची अनुभूती घेतल्यावर सकस आणि सशक्त कविता प्रसवते, असे प्रतिपादन कवी बबलू वडर यांनी केले. येथे श्री शिव-शाहू महाविद्यालयातील मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रा. आर. ए. मुडळे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे होते. श्री. वडर म्हणाले, ‘मराठी भाषा समृद्ध भाषा आहे. या भाषेचा वारसा नव्या पिढीने सक्षमपणे पुढे न्यावा.’ प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे म्हणाले, ‘मराठीचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकास, करिअरच्या यशस्वीतेसाठी होण्यासाठी प्रयत्न करावेत.’ यावेळी डॉ. पी. बी. पाटील, प्रा. प्रकाश नाईक, डॉ. के. ए. पाटील, प्रा. डी. आर नांगरे, डॉ. एन. एल. गायकवाड, प्रा. आनंदा पाटील, प्रा. राज गायकवाड उपस्थित होते. रविना पाटील हिने सूत्रसंचालन, प्रा. संगीता खरात यांनी परिचय तर प्रा. एल. के. बोराटे यांनी आभार मानले.