सरुड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरुड
सरुड

सरुड

sakal_logo
By

01284
आगामी निवडणुकीत
‘सावकार’की मोडीत निघेल

संजय राऊत; सरूडला शिवगर्जना संवाद मेळावा

सरुड, ता. ३ ः आम्ही ‘सावकार’की पोसणारे नाही तर मोडणारे लोक आहोत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ‘सावकार’की मोडीत निघेल व सत्यजित पाटील आमदार होतील; असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
येथे शिवगर्जना संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सत्यजित पाटील यांनी आमदार विनय कोरे यांचे नाव न घेता केलेल्या टीकेचा धागा पकडून त्यांनी टीकास्त्र सोडले. अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर होते.
खासदार राऊत म्हणाले, ‘सत्यजित पाटील यांच्यासारखा निष्ठावंत बरोबर असल्याचा अभिमान आहे. जे फुटून गेलेले गद्दार आहेत त्यांचा सुपडासाफ झाल्याशिवाय राहणार नाही. तुरुंगात गेलो म्हणून गुडघे टेकले नाहीत. तुरुंगातही निवडणूक घेतली असती तर निवडून आलो असतो; इतका रोष आहे.’
सत्यजित पाटील म्हणाले, ‘विरोधकांनी तीन वर्षांत केलेली विकासकामे सांगावीत? आम्ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर केलेले कामांचे नारळ फोडून ते खोट्या आश्वासनांची खैरात करत आहेत. सत्ता नसली म्हणून काही फरक पडत नाही. माझ्याबरोबर सामान्य जनता आहे.’
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, केडीसीसी संचालक रणवीरसिंह गायकवाड यांची भाषणे झाली.
यावेळी लक्ष्मण हाके, बाबासाहेब आसुर्लेकर, हंबीरराव पाटील, आनंदराव भेंडसे, नामदेव गिरी, विजय खोत, नामदेव गिरी, दत्ता पोवार, विजय बोरगे हजर होते.
.........
चौकट
‘त्यांची’ चौकशी लावा
जर चौकशी लावायचीच असेल तर शैक्षणिक संस्थेत बुरशी लागलेले साडेतीन कोटी रुपये सापडले त्यांची चौकशी लावा, असा टोला सत्यजित पाटील यांनी लगावला.