
सरुड
01293
सरूडला पेटंटवर कार्यशाळा
सरुड : विद्यार्थी, संशोधकांनी बौद्धिक संपत्तीविषयी ज्ञान अवगत करून पेटंट, कॉपीराईट, जीआय मानांकनद्वारे गुणवत्ता सिद्ध करावी, असे प्रतिपादन मुंबईच्या बौद्धिक संपदा हक्क कार्यालयाचे मयूर लोखंडे यांनी केले. येथील श्री शिव शाहू महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे बौद्धिक संपदा हक्क यावर कार्यशाळेत ते बोलत होते होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे होते. प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी व संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांनी बौद्धिक संपदा हक्क विषयी जागरूक असले पाहिजे.’ स्वागत व प्रास्ताविक प्रा. डाॅ. पी. बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश नाईक यांनी केले. यावेळी डाॅ. के. ए. पाटील, डॉ. सुगत बनसोडे, प्रा. एल. टी. आरगे, प्रा. ए. ए. पाटील, प्रा. एस. एस. घोलप, प्रा. अंजली कांबळेंसह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा. डी. आर. नांगरे यांनी मानले.