
सरुड
01295
‘श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा विकास’
सरुड : श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो. चांगला माणूस बनण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रा. आर. आर. पाटील यांनी केले. ते आनंदराव नाईक महाविद्यालय चिखलीच्या श्रमसंस्कार शिबिरात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील होते. भूषण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे सांगली जिल्हा समन्वयक डॉ. पी. आर. माळी यांच्या पुढाकाराने श्रमसंस्कार शिबिर झाले. प्रा.पाटील म्हणाले, ‘शिबिर कालावधीत व्याख्यान, इतर कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळते. श्रमाचे महत्त्व समजते.’ प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील म्हणाले, ‘शिबिरातील ज्ञान आयुष्य जगताना मोलाचे ठरते.’ प्रा. एम. एम .सूर्यवंशी यांनी आभार मानले.