पन्हाळा येथे २४ पासून राष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्हाळा येथे २४ पासून राष्ट्रीय परिषद
पन्हाळा येथे २४ पासून राष्ट्रीय परिषद

पन्हाळा येथे २४ पासून राष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

पन्हाळा येथे २४ पासून राष्ट्रीय परिषद
सरुड ः पन्हाळा येथे २४ व २५ मार्चला आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले असून ‘पर्यावरचा शाश्‍वत विकास’ या विषयावर परिषद होणार असून १५ मार्च पूर्वी या परिषदेसाठी संशोधन पेपर पाठवणे आवश्यक आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी दिली. चिखली (ता. शिराळा) येथील आनंदराव नाईक महाविद्यालय या परिषदेचे आयोजक असून शिवाजी विद्यापीठातर्फे ही परिषद पुरस्कृत आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, संस्थाध्यक्ष अमरसिंह नाईक, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, संस्था सचिव बाबासाहेब पवार यांच्या सहकार्याने सदर आंतर विद्याशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे, असेही प्राचार्य पाटील यांनी शेवटी सांगीतले.