सरुड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरुड
सरुड

सरुड

sakal_logo
By

फोटो
...

हातकणंगले लोकसभेची
निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार

माजी खासदार राजू शेट्टीः समोर कुठला पक्ष आहे याची चिंता नाही

सरुड, ता.३०ः ‘हातकणंगले लोकसभेची निवडणूक मी जनतेच्या पाठिंब्यावर व लोकवर्गणीतूनच स्वतंत्रपणे लढविणार असून पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. समोर कोण आहे, कुठला पक्ष आहे, हे आम्ही बघणार नाही,’ अशी रोखठोक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

शाहूवाडीत दौऱ्यावर आलेल्या राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या पक्ष संघटनेची भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीने हातकणंगले लोकसभेची जागा संघटनेला सोडल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले.
श्री. शेट्टी म्हणाले, ‘महायुती अथवा महाविकास आघाडीपासून आम्ही समान अंतर राखून आहोत. आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाशिवाय कसलाही विचार करावा वाटत नाही. जागा वाटपाबाबत कोणाबरोबरही एका शब्दाने चर्चा केली नसेल तर जागा वाटपाच्या यादीत आपले नाव येतेच कसे? संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही गाफील राहिलो. संघर्ष करूनही माझा पराभव झाला. पण मी पराभवाने खचणारा माणूस नाही. चळवळ माझ्या नसानसात भिनलेली आहे. जनतेच्या प्रश्नासाठी मी प्रत्येकवेळी संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. महाविकास आघाडीतून आम्ही गतवर्षीच बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही.’
....
जनताच करेक्ट कार्यक्रम करेल

शेट्टी म्हणाले, ‘लोकसभेच्या सहा जागा लढविणार आहे. आपण कोणत्याही चर्चेला अथवा बैठकीला गेलो नाही. तरीही आपल्या विषयीच्या बातम्या पेरल्या गेल्या. पण मतदारसंघाची मशागत कशी करायची आणि घात कशी साधायची यात आपण वस्ताद आहे. जनताच पेरक्या असल्याने योग्य वेळी मतदारसंघातील जनता करेक्ट कार्यक्रम करेल.’