पूर बाधित उसाला उतारा घट अनुदान मिळावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर बाधित उसाला उतारा घट अनुदान मिळावे
पूर बाधित उसाला उतारा घट अनुदान मिळावे

पूर बाधित उसाला उतारा घट अनुदान मिळावे

sakal_logo
By

पूरबाधित उसाला
उतारा घट अनुदान द्या
---
धनाजी चुडमुंगे; तिन्ही मंत्र्यांना विनंती
शिरोळ, ता. ७ ः पूरबाधित उसाला उतारा घट अनुदान मिळावे, यासाठी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.
राज्यातील अतिरिक्त ऊस गाळप करण्यासाठी, अर्धा टक्का उतारा घटसाठी २०० रुपये प्रतिटन अनुदान देण्याचा निर्णय २७ एप्रिलला मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. याबाबत दुमत नाही. तथापि, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे, साखर उताऱ्यात घट झाली आहे. २०१९ पूर्वी सरासरी साखर उतारा १२.७ इतका होता. आज सरासरी साखर उतारा १२ टक्के इतका आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १८० रुपये कमी मिळाले आहेत.
जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर या तिन्ही मंत्र्यांचे साखर कारखाने आहेत. पूरबाधित उसामुळे साखर उताऱ्यात घट झाली. यामुळे मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत या तिन्ही मंत्र्यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरबाधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उतारा घट अनुदान देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी चुडमुंगे यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00354 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top