शिरोळ नगर परिषदेमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव संमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोळ नगर परिषदेमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव संमत
शिरोळ नगर परिषदेमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव संमत

शिरोळ नगर परिषदेमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव संमत

sakal_logo
By

03663
---------
शिरोळ, चिपरी, अब्दुललाट,
मालेवाडीत विधवा प्रथा बंदचा ठराव
शिरोळ, ता. १ ः शिरोळ येथील विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी. पतीच्या निधनानंतरच्या अनिष्ट रूढी, पंरपरा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय शिरोळ नगरपालिकेने विशेष सभेत घेतला. शिरोळ नगरपालिकेची विशेष सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. उपनगराध्यक्ष तातोबा पाटील यांनी सूचक तर नगरसेविका सौ. कमलाबाई शिंदे यांनी अनुमोदन दिले. सभेस नगरसेविका कुमुदिनी कांबळे, सौ. अनिता संकपाळ, सुनीता आरगे, मुख्याधिकारी तैमुर मुलानी आदी उपस्थित होते.
----------
जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) या ग्रामपंचायतीनेही विधवा प्रथा बंदचा ठराव करून पुनर्विवाह करणाऱ्या विधवांना ग्रामपंचायतीकडून २५ हजाराचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, एक वर्षाची पाणीपट्टी व घरफाळा माफ करण्याचा निर्णयही घेतला आहे. चिपरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव मंजूर केला आहे.
---------
अब्दुललाट : येथील ग्रामपंचायत कार्यालयात बोलावलेल्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा निर्णय घेण्यात आला. उपसरपंच सौ. ज्योती चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा ठराव मंजूर केला. सौ. विद्याश्री पाटील यांनी अनुमोदन केले. याबाबत गावात जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अशा महिलांना योग्य त्या सोयीसुविधा पुरवण्यासंबंधी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहणार आहे. ग्रामविकास अधिकारी अकीवाटे, तलाठी नितीन कांबळे, पोलिसपाटील मानसिंग भोसले, मिलिंद कुरणे, स्वप्‍नील सांगावे, आप्पा पाटील, अश्विनी कांबळे, मोहन कांबळे आदी उपस्थित होते.
-----
रुकडी ः माले (ता. हातकणंगले) येथे विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते सहमत केला. विधवा प्रथेमुळे महिलांच्या नैसर्गीक हक्क, अधिकारावर गदा येते व मानवी कायद्याचा भंग होतो. तरी सर्वसामान्य महिलांप्रमाणे जीवन जगता यावे म्हणून विधवा प्रथा बंद केली आहे, अशी माहिती सरपंच प्रताप पाटील यांनी दिली. पुर्नविवाहाबाबत गावात जनजागृती करण्याचे सर्वानुमते ठरले. सूचक शिरीष पाटील तर सौ. अर्चना पाटील या अनुमोदक होत्या. सरपंच प्रताप ऊर्फ बंटी पाटील, उपसरपंच अनिता माने, अभयसिंह पाटील, संतोष खोत, सुनील कांबळे, अर्चना पाटील, सुनीता कांबळे आदी उपस्थित होते.
--------
इचलकरंजी : हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या विधवा प्रथा बंदीच्या पावलावर पाऊल टाकत नवे दानवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीनेही विधवा प्रथा बंदीबरोबरच जात पंचायत प्रथा बंदीचा निर्णय घेतला. गावसभेत गावातील विधवा महिला पुनर्विवाह करीत असेल तर ग्रामपंचायत ग्राम निधीतून विधवा महिलेला २० हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देण्याचा तसेच विधवा महिला मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या न काढता समाजामध्ये वावरत असेल तर तिचा घरफाळा व पाणीपट्टी तीन वर्षे माफ करण्याचा ठराव केला. त्याचबरोबर गावातील विधवा, परित्यक्ता, वृद्ध महिला यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून मोफत पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. गावामध्ये जात-पंचायत प्रथा बंदीचाही महत्त्वपूर्ण ठराव केला. सरपंच वंदना कांबळे, माजी सरपंच संजय धनगर, सामाजिक कार्यकर्ते राहुलराज कांबळे, प्रकाश परीट, ग्रामपंचायत सदस्य शहानूर गवंडी, कमळ कांबळे आदी उपस्थित होते.
- - - - - - - - - -
चौकट
सरपंचाची वर्षभरापूर्वीच मूठमाती
नवे दानवाडच्या सरपंच वंदना कांबळे यांनी त्यांचे पती हरिश्‍चंद्र कांबळे यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यानंतरही त्यांनी कधीच मंगळसूत्र, कपाळावरील कुंकू, बांगड्या काढल्या नाहीत. गावातील विविध डिजिटल फलकावर सरपंचांचा फोटो मंगळसूत्र व कुंकूसह असायचा. तसेच त्यांनी गावातील अनेक विकासकामांचा प्रारंभ गावातील विधवा महिलांच्या हस्ते करून आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00360 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top