सातबाराचा ब्लॉक आणि डोक्याला ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातबाराचा ब्लॉक आणि डोक्याला ताप
सातबाराचा ब्लॉक आणि डोक्याला ताप

सातबाराचा ब्लॉक आणि डोक्याला ताप

sakal_logo
By

सातबाराचा ब्लॉक आणि डोक्याला ताप
शिरोळमधील वर्ग दोनच्या जमिनीबाबत नोंदी करताना पक्षकारांना त्रास
डी. आर. पाटील ः सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. १ ः तालुक्यातील वर्ग दोनच्या जमिनीबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या दस्ताऐवजाच्या नोंदी करताना सातबाराचा ब्लॉक काढण्यासाठी पक्षकारांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. हेलपट्याच्या त्रासामुळे सातबाराचा ब्लॉक आणि डोक्याला ताप अशी गत नागरिकांची झाली आहे.
शिरोळ तालुक्यातील ५० गावे व तीन नगरपालिका क्षेत्रातील काही नागरिकांच्या शेतजमीनवर वर्ग २ चा शेरा नोंद आहे. यामुळे या शेतजमिनीचे खरेदी पत्र, तारणगहाण, हक्कसोड पत्र, भाडे पट्टा आदी प्रकारचे दस्तावेज नोंद करताना या सातबाराचा ब्लॉक तहसीलदारांच्या आदेशाने व तहसीलदार यांचा थम लावून हा सातबारा ओपन केल्यानंतर या सातबाराचे खरेदीपत्र, हक्कसोड पत्र, तारणगहाण दस्ताच्या नोंदी दुय्यम निबंधक कार्यालयात केल्या जातात.
वर्ग- दोनचा शेरा असलेल्या सातबाराचा ब्लॉक काढण्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता अर्जासोबत करावी लागते. संबंधित कागदपत्रे तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूम, तसेच भूमिअभिलेख कार्यालयाच्या रेकॉर्ड रूममधून पक्षकारांना काढावी लागतात. यासाठी तहसील कार्यालय रेकॉर्ड विभाग, तसेच भूमिअभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित सातबारावरील ब्लॉक काढण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांबाबत त्रुटी निघाल्यास नागरिकांचा वेळ वाया जातो. हेलपाट्याच्या त्रासामुळे सातबाराचा ब्लॉक आणि डोक्याला ताप, अशी परिस्थिती नागरिकांची झाली आहे.
--------------
सातबारावरील ब्लॉक काढण्यासाठी नागरिकांनी कागदपत्रे यादीप्रमाणे दिल्यास त्यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तसेच ज्या नागरिकांनी कागदपत्र दिले आहेत, त्यांना कागदपत्राची पूर्तता करा, म्हणून स्मरणपत्र दिले जातील.
-योगेश जमदाडे, नायब तहसीलदार, शिरोळ

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00361 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top