
शिरोळला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
शिरोळला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
शिरोळ, ता. १५ः जिल्हा परिषदेच्या दवाखान्याबाबत सामान्य जनतेत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कर्मचारी मानवतेच्या भावनेतून जबाबदारीने आरोग्य सेवा देत आहेत. कुटुंब कल्याण व लोकसंख्या नियंत्रणाबाबत कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळेच जिल्हा परिषदेने शिरोळ पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचा गौरव केला आहे. याचे सर्व श्रेय पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी सेवकांचे आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी शंकरराव कवितके यांनी केले.
येथील पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त काल (ता. १५) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती जे. जे. माणगावे व आरोग्य कर्मचाऱ्यांचा २०२१-२२ कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये गौरव केला. केतकी गवळी, वंदना शेजाळ, कांचन चौगुले, अंजुम मेवेकरी, विनायक कुंभार, मंदाकिनी लाड या कर्मचाऱ्यांचा आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार केला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. पाखरे यांनी संभाव्य पूरपरिस्थितीचे नियोजन व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पी. आर. खटावकर यांनी पूरपरिस्थिती व कीटकजन्य आजार याविषयी मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती वासंती पाटील, डॉ. विवेक जोशी, डॉ. नितीन डोणे, डॉ. श्रीमती जे. जे. माणगावे, डॉ. श्रीमती जाधवर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00385 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..