ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरास प्रतिसाद
ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरास प्रतिसाद

ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरास प्रतिसाद

sakal_logo
By

ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरास प्रतिसाद
शिरोळ, ता. २५ ः येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोफत रक्तशर्करा, रक्तदाब व नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद मिळाला. जीवन प्रकाश डायग्नोस्टिक सेंटर, जीवन प्रकाश पॅरामेडिकल कॉलेज व लायन्स क्लब यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले होते. येथील समस्त कुंभार समाज सभागृहात आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष आत्माराम मुळीक अध्यक्षस्थानी होते.
शिबिरात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक माहिती देऊन डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. प्रकाश दीपंकर, डॉ. अभिता दीपंकर, डॉ. शिवाजी पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हेल्थ कार्ड वाटप केले. नगराध्यक्ष पाटील, डॉ. अभिता दीपंकर यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे राजाराम कुंभार, अशोक चौगुले, प्रकाश पाटील, अशोक कांबळे, सदाशिव बेंद्रे, अमरसिंह कांबळे, शिवाजीराव पाटील - कौलवकर, गणपती कुंभार, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00397 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top