नोकरी लावण्याची आमिषाने पाच लाखाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरी लावण्याची आमिषाने पाच लाखाची फसवणूक
नोकरी लावण्याची आमिषाने पाच लाखाची फसवणूक

नोकरी लावण्याची आमिषाने पाच लाखाची फसवणूक

sakal_logo
By

संभाजीपूरच्या महिलेला
पाच लाख रुपयांना गंडा
संशयितावर गुन्हा; मुलींना नोकरीचे आमिष
शिरोळ, ता. २८ ः बीएसएनएल कंपनीत लिपिकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सांगून पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील एकावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला. भूपाल लक्ष्मण कोळी (संभाजीपूर) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सुनीता सागर हुपरे (गणेश कॉलनी, संभाजीपूर) यांच्या मुली श्वेतांजली व स्नेहल यांना बीएसएनएल कंपनीत लिपिकाची नोकरी लावतो असे सांगून संशयित भूपाल कोळी याने वेळोवेळी पाच लाख रुपये सुनीता हुपरे यांच्याकडून घेतले. तथापि अनेक दिवस उलटूनही नोकरी न लावल्याच्या कारणावरून भूपाल कोळी याच्याकडे दिलेली रक्कम मागितली. रक्कम देणार नाही, तुम्हाला काय करायचे असेल ते करा, असे उत्तर कोळीने दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनीता हुपरे यांनी शिरोळ पोलिसांत भूपाल कोळी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00402 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..