शिर्डीतील अधिवेशनात सहभागी व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिर्डीतील अधिवेशनात सहभागी व्हा
शिर्डीतील अधिवेशनात सहभागी व्हा

शिर्डीतील अधिवेशनात सहभागी व्हा

sakal_logo
By

शिर्डीतील अधिवेशनात सहभागी व्हा
---
सागर चव्हाण; शिरोळ तालुका मंडप, लाईटिंग असोसिएशनचा मेळावा
शिरोळ, ता. ९ ः मंडप, लाइटिंग, डेकोरेटर्स यासह उद्योग-व्यावसायिक प्रामाणिक काम करीत आहेत. शासनाने या व्यावसायिकांसाठी सेवा-सवलती देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याची गरज आहे. राज्यात मंडप, लाइटिंग, डेकोरेटर्स, केटरर्स संघटनेची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. शिर्डी येथे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या अधिवेशन कार्यक्रमात उद्योग- व्यवसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मंडप, लाइटिंग, डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागर चव्हाण यांनी केले.
येथील टारे क्लब हाउसमध्ये शिरोळ तालुका मंडप व लाइटिंग असोसिएशनतर्फे तालुकास्तरीय उद्योजकांचा मेळावा झाला. शिरोळ तालुका असोसिएशनचे पुंडलिक महात्मे यांनी स्वागत केले. जयसिंगपूर शहराध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी प्रास्ताविक केले. श्री. चव्हाण म्हणाले, की गेल्या अडीच वर्षांत कोरोना व उद्योग-व्यवसायांतील मंदीमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील मंडप, लाइटिंग उद्योग-व्यावसायिकांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. दोन वर्षांतील कोरोनात तसेच अन्य कारणांमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. या परिस्थितीत शासनाने मंडप, लाइटिंग, डेकोरेटर्स, केटरर्स, बँड यासह संलग्न उद्योजकांना आर्थिक मदत करावी. विनायक सूर्यवंशी, दीपक मगर, फिरोज आतार, धनाजी शिंदे, कृष्णात वरुटे, विकास कवडे, अशपाक मुल्ला, बाळासाहेब कोतवाल, बाजीराव शिंदे, उमर मकानदार, सुनील माळी, बापू करपे, भरत कोळेकर, तुकाराम पाटील, सुनील व्हनागडे, मुसा शेख, विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00419 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..