अवैध्य गुटख्याची वाहतूक करणाऱ्या लातूरच्या दोघा संशयितांना ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध्य गुटख्याची वाहतूक करणाऱ्या लातूरच्या दोघा संशयितांना ताब्यात
अवैध्य गुटख्याची वाहतूक करणाऱ्या लातूरच्या दोघा संशयितांना ताब्यात

अवैध्य गुटख्याची वाहतूक करणाऱ्या लातूरच्या दोघा संशयितांना ताब्यात

sakal_logo
By

शिरोळमध्ये गुटखा, पान मसाला पकडला
लातूरच्या दोघांना अटक; मोटारीसह ८.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शिरोळ, ता. १० ः गुटखा व पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या लातूरच्या दोघा संशयितांना शिरोळ पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. आठ लाख ९३ हजारचा गुटखा पान मसाल्‍याबरोबरच मोटार असा तेरा ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमर पाशा गिअर शेख (वय २८) व रफिक मोहम्मद शेख और (इस्लामपूर, जि. लातूर) असे संशयित आरोपींची नावे आहेत.
मिळालेली माहिती अशी, अमर शेख व रफिक शेख दोघेही मोटार (एमएच २४ ए बी ८१६६) मधून गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिस निरीक्षक दत्तात्रेय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, विश्वास कुरणे, अमलदार ज्ञानेश्वर सानप, ताहीर मुल्ला व कडूबा जाधव यांच्या पथकाने शिरोळ नृसिंहवाडी रोडवर मोटार अडवली. मोटारीच्या समोरील व मागील बाजूस प्लास्टिकचे कॅरेट लावले होते. पथकाने मोटारीची झडती घेतली असता गुटखा, पानमसाल्याच्या बॅगा मिळून आल्या. अमर शेख व रफिक शेख यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात अमर शेख व रफिक शेख बंटी नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून वाहतूक करीत असल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00422 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..