कदम परिवाराकडून वृद्धाश्रमास मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदम परिवाराकडून वृद्धाश्रमास मदत
कदम परिवाराकडून वृद्धाश्रमास मदत

कदम परिवाराकडून वृद्धाश्रमास मदत

sakal_logo
By

कदम परिवाराकडून वृद्धाश्रमास मदत
शिरोळ, ता. २१ : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व कामगार प्रतिनिधी अमर ऊर्फ नाना कदम यांनी आपले वडील कै. डॉ. आनंदराव हरी कदम यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमास धान्य स्वरूपात मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
कै. डॉ. आनंदराव कदम हे शिरोळ परिसरात नामवंत पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. अनेक वर्षे त्यांनी पशुवैद्यकीय सेवा अविरतपणे स्वीकारून मुक्या प्राण्यांची काळजी घेतली होती. गेल्यावर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचा मुलगा अमर ऊर्फ नाना कदम आणि कदम परिवारातील सदस्यांनी डॉ. आनंदराव कदम यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला फाटा देऊन घोसरवाड जानकी वृद्धाश्रमातील अनाथांना दोन घास मिळावेत यासाठी धान्य स्वरूपात मदत केली. जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक बाबासाहेब पुजारी यांनी वृद्धाश्रमास मदत केल्याबद्दल कदम परिवाराचे आभार मानले. सौ. पूनम कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00429 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..