शिरोळला ७५ वृक्षांची लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोळला ७५ वृक्षांची लागवड
शिरोळला ७५ वृक्षांची लागवड

शिरोळला ७५ वृक्षांची लागवड

sakal_logo
By

शिरोळला ७५ वृक्षांची लागवड
शिरोळ ः श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिरोळ नगरपरिषद, तसेच माजी सरपंच दरगू गावडे सोशल फाउंडेशनतर्फे ७५ वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. येथील संगमनगरमधील समाज मंदिराच्या आवारात वृक्षारोपण केले. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, ‘नगरपरिषदेतर्फे सुमारे एक लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता लावलेली झाडे वाढण्याचे काम परिसरातील नागरिकांनी करावे.’ माजी सरपंच गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते अनिलराव यादव प्रताप ऊर्फ बाबा पाटील, नगरसेवक राजेंद्र माने, तात्या पाटील, अरविंद माने आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00444 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..