कृती समितीतर्फे शिरोळमध्ये मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृती समितीतर्फे शिरोळमध्ये मोर्चा
कृती समितीतर्फे शिरोळमध्ये मोर्चा

कृती समितीतर्फे शिरोळमध्ये मोर्चा

sakal_logo
By

47019
-------
कृती समितीतर्फे शिरोळमध्ये मोर्चा
कल्लेश्वर तलावाच्या पूर्वेची जागा पालिकेच्या ताब्यात ठेवण्याची मागणी
शिरोळ, ता. १ ः येथील कलेश्वर तलावाच्या पूर्वेस असलेली सिटी सर्व्हे क्रमांक २८७३ ची जागा सार्वजनिक कामकाजासाठी शिरोळ नगरपरिषदेच्या ताब्यात रहावी. गावच्या हितासाठी शासकीय जमीन खासगी व्यक्तीला न देता शहराच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी आरक्षित राहावी या प्रमुख मागणीसाठी शिरोळ सार्वजनिक जागा बचाव कृती समितीतर्फे येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बचाव कृती समितीतर्फे नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना निवेदन दिले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ व महिलांतर्फे मोर्चा काढला. मोर्चा शिरोळ तहसील कार्यालयावर येताच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, डॉ. अरविंद माने यांनी मनोगत व्यक्त केले. गावच्या मालकीची जागा नगरपरिषदेकडे राहिली पाहिजे, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, अशा भावना व्यक्त केल्या. नगरसेवक पंडित काळे, प्रकाश गावडे, राजेंद्र माने, योगेश पुजारी, राजाराम कोळी, विजयसिंह माने -देशमुख, अविनाश टारे, किरण गावडे ,पांडुरंग माने , अमरसिंह शिंदे, सुरज कांबळे, विजय आरगे आदी सहभागी झाले होते. तात्यासो पाटील यांनी स्वागत केले. माजी सरपंच दरगू गावडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00448 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..