‘पी एम किसान’ मधून अपात्रची मागणी करुनही निधी जमा ः शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पी एम किसान’ मधून अपात्रची मागणी करुनही निधी जमा ः शेट्टी
‘पी एम किसान’ मधून अपात्रची मागणी करुनही निधी जमा ः शेट्टी

‘पी एम किसान’ मधून अपात्रची मागणी करुनही निधी जमा ः शेट्टी

sakal_logo
By

‘पीएम किसान’मधून अपात्रतेची
मागणी करूनही निधी जमा ः शेट्टी
शिरोळ, ता. ७ ः पीएम किसान योजनेंतर्गत मिळणारी मदत या योजनेतून आपणास अपात्र करावे, अशी मागणी करूनही आपल्या खात्यावर रक्कम जमा होत आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा सतर्क नाही, याचे मला आश्चर्य वाटते, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
त्यांनी तहसीलदार सौ. अपर्णा मोरे-धुमाळ यांच्याशी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याबाबत सविस्तर चर्चा केली.
ते म्हणाले, ‘‘पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत अकरावा हप्ता ३१ मे रोजी माझ्या खात्यात जमा झाला. यापूर्वीही आपणास या योजनेतून अपात्र करावे, अशी लेखी मागणी केली असतानाही पीएम किसान योजनेंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होत आहे. या योजनेचा गरजू शेतकऱ्यांना लाभ व्हावा.’’ योजनेतून आपणास अपात्र करावे, अशी पुन्हा लेखी मागणी त्यांनी केली.
शासनाच्या धोरणानुसार आजी-माजी खासदार, आमदारांना या योजनेतून वगळले असताना मी लोकसभेचा माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार अपात्र असूनही हा सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा होत आहे. यापूर्वीही मी स्वत: ६ हप्ते जमा झाल्यानंतर १२ हजारांचा धनादेश शासनास परत करून या योजनेतून मला अपात्र करण्याबाबत पत्र दिले असतानाही आजअखेर ११ हप्ते नियमित जमा झालेले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00457 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..