शिरोळला ईर्षाने मिरवणुका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोळला ईर्षाने मिरवणुका
शिरोळला ईर्षाने मिरवणुका

शिरोळला ईर्षाने मिरवणुका

sakal_logo
By

49302
शिरोळ : जय भवानी मंडळाच्या मिरवणुकीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा.
49306
शिरोळ : अजिंक्यतारा मंडळाच्या मिरवणुकीतील मुखवट्यांचा देखावा.
49308
शिरोळ : अजिंक्यतारा गणेश मित्र मंडळाच्या मिरवणुकीतील ढोल पथकावर उभा राहून ताशा वाजवणारा कलाकार


शिरोळला ईर्ष्याने मिरवणुका
शिरोळ : ढोल-ताशा व साउंडसिस्टीनचा दणदणाट, पारंपरिक वेशभूषा व वाद्याच्या गजरात, ऐतिहासिक सजीव देखाव्यांसह येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी, भव्य मिरवणूक काढून, बाप्पांना अखेरचा निरोप दिला. दोन वर्षाच्या कोरोना महामारीमुळे, सार्वजनिक गणेशोत्सव निर्बंध आले होते. निर्बंध उठवल्यामुळे येथील ३५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रचंड ईर्षाने मिरवणुकी काढल्या.
अजिंक्यतारा मंडळ, बाल शिवाजी मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, नवशक्ती मंडळ, हनुमान तालीम मंडळ, गोडीवरी तालीम मंडळ, बाजारपेठ गणेशोत्सव मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, क्रांती चौक गणेश उत्सव मंडळ यास विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुका जोरदार काढल्या. मिरवणुकीमध्ये ढोल ताशा, बँजो पथक, बँड पथकाचा समावेश होता. अजिंक्यतारा मंडळाची मिरवणूक शिस्तबद्ध ठरली. जय भवानी मंडळाने पौराणिक व शिवकालीन सजीव देखावे केले. नवशक्ती मंडळाचा हत्ती, बाजारपेठ गणेश मित्र मंडळाने टाळ मृदंगाच्या वाद्याच्या साह्याने काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. काही मंडळींनी साउंड सिस्टीमचा वापर करताना पोलिसांनी घातलेले आवाजावरील निर्बंधांचे उल्लंघन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00458 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..