कुटवाड येथे लंपी आजाराने गायीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुटवाड येथे लंपी आजाराने गायीचा मृत्यू
कुटवाड येथे लंपी आजाराने गायीचा मृत्यू

कुटवाड येथे लंपी आजाराने गायीचा मृत्यू

sakal_logo
By

कुटवाडमध्ये लम्पीने गाईचा मृत्यू
शिरोळ ः कुटवाड (ता. शिरोळ) येथे गाईचा लम्पी आजाराने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील हा पहिला बळी ठरल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. कुटवाड येथील दत्तात्रय गणपती पाटील यांच्या संकरित गाईला पंधरा दिवसांपूर्वी आजाराची लागण झाली होती. हसूर येथील पशुवैद्यक सागर पटेल यांनी गाईवर औषधोपचार केले. गायीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आज पहाटे गायीचा मृत्यू झाला. पशुवैद्यक डॉ. पटेल म्हणाले, ‘‘पाटील यांच्या गायीला लंपीसदृश, तीन चार गाठी उठल्या होत्या. ताप आल्याने गाय वैरण खात नव्हती. दोन दिवसांपासून तिची प्रकृती सुधारली होती. तथापि शुक्रवारी सकाळी या गायीचा मृत्यू झाला आहे. या गायीचे विच्छेदन करून अहवाल तयार केला आहे.

१८६३
सरोळी येथून तरुण बेपत्ता
नेसरी : सरोळी (ता. गडहिंग्लज) येथील प्रतिक अशोक कोले (वय २५) बेपत्ता झाला आहे. बुधवारी (ता.१४) दुपारी एक वाजताच्या सुमारास गोवा येथे जातो असे सांगून निघून गेला आहे. तो अद्याप गोव्यातही पोहोचला नाही व घरीही आलेला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची वर्दी आई कल्पना अशोक कोले यांनी नेसरी पोलिसांत दिली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल एस. पी. भोसले करत आहेत.

घोगराई नागरी पतसंस्थेस तीन लाख नफा
घुणकी : पाडळी (ता. हातकणंगले) येथील घोगराई नागरी पतसंस्थेस तीन लाख रुपये नफा झाला असून लाभांश दहा टक्के देणार असल्याची घोषणा अध्यक्ष धनंजय देसाई यांनी जाहीर केले. पाडळी (ता. हातकणंगले) येथील घोगराई नागरी सहकारी संस्थेच्या सभेत देसाई बोलत होते. अध्यक्षस्थानी नागनाथ मेथे पाटील होते. संचालक दिनकर पाटील यांनी स्वागत केले. सचिव देवदास जाधव यांनी विषयवाचन केले. सभासदांनी सर्व विषय मंजूर केले. माजी सरपंच, संचालक प्रकाश पाटील, जयसिंगराव खामकर पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खामकर, संचालक राजाराम पाटील, विलास मुळीक, रमेश सवळेकरी, कोंडीबा पोवार, नामदेव मेथे, सुरेश पाटील, निवृत्ती वाघमोडे, मधुकर दाभाडे, संभाजी जाधव, यशवंत कोगेकर, भारती खामकर, रत्‍नाबाई मुळीक उपस्थित होते.

२८८१
यशश्रीने मिळविला ६२५ वा क्रमांक
कुरुंदवाड ः गौरवाड (ता. शिरोळ) येथील यशश्री गणोजी माने हिने जेई अॅडव्हान्स परिक्षेत ६२५ वा क्रमांक पटकावला. ज्ञानदिप विद्यामंदिर खेड (रत्नागिरी) येथे तिचे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले असून यापूर्वी ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा तर ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक तर दहावीत राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. यशाची कमान तिने चढती ठेवताना १२ वीत ९३ टक्के सीईटीत ९९.०४ टक्के, जेई मेन्समध्ये ९७.५३ टक्के गुण मिळविले. भरतनाट्यम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00467 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..