दत्त भांडारतर्फे १० टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दत्त भांडारतर्फे १० टक्के लाभांश
दत्त भांडारतर्फे १० टक्के लाभांश

दत्त भांडारतर्फे १० टक्के लाभांश

sakal_logo
By

दत्त भांडारतर्फे १० टक्के लाभांश
शिरोळ, ता. २१ ः ग्राहक चळवळ टिकवून ठेवत असताना उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त भांडारने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. अहवाल सालात संस्थेस २,७८,२०८ रुपयांचा नफा झाला आहे. तीन वर्षांपासून सभासदांना वस्तूरूपात लाभांश देण्यात येत आहे. या वर्षीही १० टक्केप्रमाणे वस्तूरूपात लाभांश देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री दत्त भांडार अर्थात श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था लि.चे चेअरमन दामोदर सुतार यांनी दिली.
श्री दत्त भांडारची वार्षिक सभा झाली. स्वागत व प्रास्ताविक दामोदर सुतार यांनी केले. जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे यांनी नोटीस आणि सभेपुढील विषयपत्रिकेचे वाचन केले. उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, ‘भांडारने अद्ययावत आधुनिकीकरण, ग्राहकांना विनम्र व आपुलकीची सेवा, माफक दर व स्पर्धेच्या युगातही विश्वासार्हता जपण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र शासनाची कामगार कल्याण योजना लागू केली असून प्रोत्साहन म्हणून सर्वच कर्मचाऱ्यांना अहवाल सालात १६.६६ टक्के बोनस दिला आहे.’ जयसिंगपूर उदगाव बँकेचे चेअरमन महादेव राजमाने, डॉ. राजश्री पाटील, शिवाजी पोळ, तात्यासाहेब कोरे सहकारी शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे सुनील मालप आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार नासर पठाण यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00470 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..