ऊरुसासाठी लोकवर्गणी जमा करण्यास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊरुसासाठी लोकवर्गणी जमा करण्यास प्रारंभ
ऊरुसासाठी लोकवर्गणी जमा करण्यास प्रारंभ

ऊरुसासाठी लोकवर्गणी जमा करण्यास प्रारंभ

sakal_logo
By

ऊरुसासाठी लोकवर्गणी
जमा करण्यास प्रारंभ
शिरोळ, ता. १३ ः येथील ग्रामदैवत बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरुस साजरा करण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत केला. १४ ते १७ नोव्हेंबरदरम्यान बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरुस साजरा होत आहे. अजिंक्यतारा मंडळास उत्सव व उरूस संयोजन समितीचा मान मिळाला आहे.
बुवाफन महाराज मंदिरात आज मान्यवरांच्याहस्ते श्रीफळ वाढवून लोकवर्गणी जमा करण्याचा प्रारंभ केला. यावेळी मान्यवरांनी उरुसासाठी देणगी सुपूर्द केली. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजप नेते अनिलराव यादव, दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे, रणजितसिंह पाटील, नगरसेवक तातोबा पाटील, माजी सरपंच गजानन संकपाळ, अर्जुन काळे, शिवाजीराव माने -देशमुख, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, भगवान आवळे, निळकंठ फल्ले, दिलीप माने, रामचंद्र पाटील, शक्तिजीत गुरव, मंदिराचे पुजारी अशोक हिरेमठ, अमोल हिरेमठ, महांतेश हिरेमठ आदी उपस्थित होते. अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील- नरदेकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष प्रकाश माळी यांनी आभार मानले.