कागदपत्रे नसणाऱ्या दोन वाहना वरती दंडात्मक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागदपत्रे नसणाऱ्या दोन वाहना वरती दंडात्मक कारवाई
कागदपत्रे नसणाऱ्या दोन वाहना वरती दंडात्मक कारवाई

कागदपत्रे नसणाऱ्या दोन वाहना वरती दंडात्मक कारवाई

sakal_logo
By

शिरोळमध्ये वाहनधारकांना दंड

शिरोळ, ता. ३०ः ऊसदराबाबत ‘आंदोलन अंकुश’ने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उसाची वाहने अडवण्यास प्रतिबंध केला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आंदोलकांनी वाहनांची कागदपत्रे तपासावीत, अशी भूमिका घेतली. या वाहन तपासणीच्या मोहिमेत दोन वाहनांची कागदपत्रे नसल्यामुळे वाहनधारकांना प्रत्येकी १६ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिस वाहने रस्त्यावर आडवू देत नाहीत. त्यामुळे उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे कायद्याने तुम्ही तपासा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली आहे. रविवारी अशा दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, पोलिसांच्या या भूमिकेमुळे वाहनमालकांचे धाबे दणाणले आहेत.