आंदोलन अंकुशची मोटार सायकल रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलन  अंकुशची मोटार सायकल रॅली
आंदोलन अंकुशची मोटार सायकल रॅली

आंदोलन अंकुशची मोटार सायकल रॅली

sakal_logo
By

‘आंदोलन अंकुश’ची मोटारसायकल रॅली

शिरोळ ता. ३१ः गेली चार दिवस ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने ऊसदराबाबत शिरोळ तालुक्यात कोयता बंद आंदोलन सुरू आहे. तथापि, काही ठिकाणी ऊस तोडी सुरू आहेत. त्या बंद करण्यासाठी ‘आंदोलन अंकुश’ने आज शिरोळ तालुक्यात मोटारसायकल रॅली काढली. या दरम्यान शिरोळमधील शरद साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयास, जयसिंगपूरमधील पंचगंगा कारखान्याच्या गट ऑफिसला आणि दानोळी येथील जवाहर साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयास कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले. यानंतर ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी घोडावत खांडसरीला भेट दिली. यावेळी २९०० रुपये जाहीर केलेला दर आम्हाला मान्य नसून किमान तीन हजार रुपये जाहीर करावा. मगच ऊस तोडी सुरू कराव्यात; अन्यथा कारखाना बंद करावा, अशी मागणी केली.

यावेळी ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, भूषण गंगावणे, अक्षय पाटील, कृष्णा गावडे, आप्पा कदम, संजय चौगुले, अमोल गावडे यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याबाबत ‘आंदोलन अंकुश’ने सुरू केलेल्या आंदोलनास सहकार्य करावे, अशा मागणीचे निवेदन शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड या पोलिस ठाण्यास देण्यात आले.