आंदोलन अंकुशच्या आठ कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलन अंकुशच्या आठ कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल
आंदोलन अंकुशच्या आठ कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल

आंदोलन अंकुशच्या आठ कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल

sakal_logo
By

‘आंदोलन अंकुश’च्या
कार्यकर्त्यांविरोधात फिर्याद


शिरोळ, ता. १ ः ‘आंदोलन अंकुश’च्या आठ कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर चालकांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची फिर्याद शिरोळ पोलिस ठाण्यामध्ये जयराम महादेव सर्जे या चालकाने दिली आहे. सोमवारी रात्री जयराम सर्जे हे उसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन जात असताना शिरटी फाट्यावर ‘आंदोलन अंकुश’च्या आठ कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर अडवून शिवीगाळ केली. तसेच, पुन्हा ऊस वाहतूक करायची नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी धनाजी चुडमुंगे, महेश जाधव, योगेश जाधव, प्रवीण माने, एकनाथ माने, राकेश जगदाळे (सर्व रा. शिरोळ) व आप्पा कदम (रा. चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे.