...अन्यथा नगरपालिकेच्या दारात कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...अन्यथा नगरपालिकेच्या दारात कचरा
...अन्यथा नगरपालिकेच्या दारात कचरा

...अन्यथा नगरपालिकेच्या दारात कचरा

sakal_logo
By

...अन्यथा नगरपालिकेच्या दारात कचरा
---
शिरोळमध्ये आम आदमी पक्षातर्फे इशारा; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
शिरोळ, ता. ९ ः शहरातील विविध भागांत अनेक महिन्यांपासून नियमित कचरा उठाव होत नाही. अनेक भागांत अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कचरा उठाव नियमित करावा व नालेसफाई करावी, अन्यथा कचरा नगरपालिका दारात आणून टाकू, असा इशारा आम आदमी पक्षातर्फे देण्यात आला आहे.
आम आदमी पक्षातर्फे शिरोळ नगरपरिषद मुख्याधिकारी अभिजित हराळे यांना शहरातील कचरा उठाव नियमित करून नाले सफाई व रखडलेले बांधकाम तत्काळ करण्याचे निवेदन दिले. भविष्यात ज्या भागातून नागरिकांच्या कचऱ्यासंदर्भात तक्रारी येतील, त्या भागातील कचरा नगर परिषदेच्या दारात आणून टाकण्याचा इशारा आम आदमी पक्षातर्फे प्रशासनाला दिला आहे.
आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन कदम, जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, संदीप जाधव, धैर्यशील दळवी, शंकर जाधव, बाळकृष्ण हसुरे, स्वराज क्रांती संघटनेचे संस्थापक आदम मुजावर, वीरभद्र सपाडल, आकाश धुमाळ, यशवंत पाटील, विवेक कुंभार आदी उपस्थित होते.