वादग्रस्त जागेचा प्रशासनाकडून पंचनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादग्रस्त जागेचा प्रशासनाकडून पंचनामा
वादग्रस्त जागेचा प्रशासनाकडून पंचनामा

वादग्रस्त जागेचा प्रशासनाकडून पंचनामा

sakal_logo
By

वादग्रस्त जागेचा प्रशासनाकडून पंचनामा
वस्तूस्थिती अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
शिरोळ, ता. ११ ः येथील कल्लेश्वर तलावाच्या पूर्व बाजूस असलेल्या त्या वादग्रस्त जागेबाबत वस्तूस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यामुळे ऐन उरुसात या जागेचा पंचनामा प्रशासनातर्फे केला.
कलेश्वर तलावाच्या पूर्व बाजूस असलेल्या जागेच्या मालक सदरी देसाई यांनी नाव लागल्यानंतर या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. या जागेवर शिरोळचा ऐतिहासिक बुवाफण महाराजांचा उरूस भरला जातो. तसेच ही जागा चुकीच्या पद्धतीने देसाई यांच्या नावे लागली असल्याचा आरोप, ग्रामस्थ व नगरपरिषदेतर्फे करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या जागेचा वस्तूस्थितीचा अहवाल भूमी अभिलेख कार्यालयाकडून कार्यालयाने द्यावा, असे आदेश दिले होते. शुक्रवारी भूमी अभिलेख कार्यालयाचे शिरस्तेदार एस. एस. उत्तूरकर, निमतानदार एस. बी. तेली व पुंडलिक पाटील अहवाल तयार करण्यासाठी वादग्रस्त जागेवर आले होते. शहरातील विविध मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ लोकप्रतिनिधी व देसाई कुटुंबीय उपस्थित होते. सार्वजनिक कामकाजासाठी तसेच ग्रामदैवत बुवाफण महाराज यांच्या उरुसासाठी ही जागा राहिली पाहिजे यासाठी नगर परिषदेतर्फे न्यायालयीन लढाई सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली.