रास्ता रोको करणाऱ्या आंदोलन अंकुश च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रास्ता रोको करणाऱ्या आंदोलन अंकुश च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
रास्ता रोको करणाऱ्या आंदोलन अंकुश च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

रास्ता रोको करणाऱ्या आंदोलन अंकुश च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

sakal_logo
By

आंदोलन अकुंश संघटनेचे
शिरोळला रास्ता रोको आंदोलन

शिरोळ, ता.२४ ः चालू गळीत हंगामात पहिली उचल तीन हजार रूपये आणि मागील हंगामातील दुसरा हप्ता मिळावा, या मागणीकरीता आंदोलन अकुंश संघटनने दत्त साखर कारखान्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिस आंदोलकांना ताब्यात घेतना झटापट झाली.
आंदोलन अकुंश संघटनेतर्फे चालू गळीत हंगामात पहिली उचल तीन हजार शंभर रूपये आणि मागील हंगामातील दुसरा हप्ता मिळावा या मागणीकरीता , ठिय्या आंदोलन सुरू आहे. दराबाबत कारखाना चर्चा करण्यासाठी तयार नसल्याने शिरोळ-जयसिंगपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धनाजी चुडमुंगे म्हणाले, ‘दत्त, गुरूदत, जवाहर, शरद साखर कारखान्याने 2900 रुपये दर देवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. गेल्या वर्षीचा हिशोब साखर कारखाने देत नाहीत. सरकार यामध्ये लक्ष घालत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा.?’
आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, अक्षय पाटील, उदय होगले, अजित सुतार यांच्या सह आंदोलक उपस्थित होते.