कुटवाडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची नेमणूक करावी, याकरीता केले थाळीनाद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुटवाडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची नेमणूक करावी, याकरीता केले थाळीनाद आंदोलन
कुटवाडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची नेमणूक करावी, याकरीता केले थाळीनाद आंदोलन

कुटवाडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची नेमणूक करावी, याकरीता केले थाळीनाद आंदोलन

sakal_logo
By

ich-shi2 51jpg 65895
शिरोळ ः येथील पंचायत समितीसमोर आंदोलन करताना विद्यार्थी.

शिरोळ पंचायत समितीवर
विद्यार्थी, पालकांचा मोर्चा

कुटवाडला रिक्त शिक्षकांच्या नेमणुकीची मागणी

शिरोळ, ता. १ ः कुटवाड (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रिक्त शिक्षकांची नेमणूक करावी, या मागणीसाठी शालेय विद्यार्थी व पालकांनी येथील पंचायत समितीच्या कार्यालयावर थाळी व घंटानाद करत मोर्चा काढला. यावेळी तीन तास आंदोलन चालले. तात्पुरत्या स्वरूपात सोमवारी एका शिक्षकाची नेमणूक करू, असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
येथील कुमार विद्यामंदिरात पहिली ते सातवीपर्यंत, तसेच मगदूम मळ्यातील प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार दोन शिक्षक कमी आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीवर परिणाम होत असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.
सरपंच रेशमा कांबळे, उपसरपंच भाग्यश्री जाधव, माजी सरपंच नवजीत पाटील, पोपट खोत, उमेश खराडे, विजय पाटील, किरण कांबळे आदी पालकांनी गटविकास अधिकारी, प्रभारी गटशिक्षण अधिकाऱ्यांवर प्रश्नांची खैरात केली. शिक्षकाची नेमणूक केल्याखेरीज आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
दरम्यान, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपचे जिल्हा युवा अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी शिक्षकाची तत्काळ नेमणूक करावी, अशी मागणी केली.
गटशिक्षणाधिकारी दीपक कामत व गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी वरिष्ठांना माहिती दिली. फेब्रुवारीमधील बदली प्रक्रियेत येथे शिक्षक उपलब्ध होतील, अशी ग्वाही दिली.