Wed, Feb 1, 2023

दत्त कारखान्यातर्फे गुरुवारी मेळावा
दत्त कारखान्यातर्फे गुरुवारी मेळावा
Published on : 4 December 2022, 11:22 am
दत्त कारखान्यातर्फे गुरुवारी मेळावा
शिरोळ ः येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्यातर्फे गुरुवारी (ता. ८) कारखाना कार्यस्थळावर शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे ‘हवामान आधारित शेती’ या विषयावर मार्गदर्शन होणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना हवामानाच्या बदलाचा मोठा त्रास होऊन नुकसान सोसावे लागते. या पार्श्वभूमीवर डख यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी व युवा व्याख्याते वसंत हंकारे यांचेही मार्गदर्शन होणार आहे. दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा.’’ कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील उपस्थित होते.