नोकरीसाठी रोज २४ किमी सायकल प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरीसाठी रोज २४ किमी सायकल प्रवास
नोकरीसाठी रोज २४ किमी सायकल प्रवास

नोकरीसाठी रोज २४ किमी सायकल प्रवास

sakal_logo
By

71869
सुनील कदम
--------
नोकरीसाठी रोज २४ किमी सायकल प्रवास
शिरोळमधील सुनील कदम २६ वर्षांपासून चौंडेश्वरी सुतगिरणीत कामास
डी. आर. पाटील ः सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. ३० ः सायकलवरील प्रवास म्हणजे स्वतःचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि मन, मनगट बळकट करण्यासाठी एक उत्तम साधन आहे. शिरोळ येथील सुनील कदम हे २६ वर्षे नोकरीवर दररोज सायकलवरून प्रवास करतात. वयाच्या ५२ वर्षापर्यंत कोणत्याही औषधाची एक गोळी त्यांनी घेतलेली नाही.
आधुनिक काळात वेळेला महत्व देण्याच्या कारणावरून अनेक जण वाहनांचा वापर करतात. गल्लीतील दुकानातील किराणामाल आणावयाचा झाल्यास मोटारसायकलचा वापर केला जातो. वाहनांच्या अतिरिक्त व्यापरामुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. तसेच आर्थिक तोटाही होत आहे. स्वतःबरोबर, देश हित जोपासले पाहिजे, या भावनेतून आजही वयाच्या ५२ व्या वर्षी दररोज२४ किलोमीटरचा प्रवास कदम करतात.
शिरोळ ते चौंडेश्वरी सूतगिरणी असा चढउतार असणारा रस्ता आहे. मात्र २६ वर्षे ते सायकलीवरून नोकरीला जात आहेत. सुरुवातीच्या काळात चौंडेश्वरी सूतगिरणीत वॉचमन म्हणून नोकरी स्वीकारली. त्यावेळी सातशे रुपये पगार होता. त्यांनी जुन्या सायकलवरून प्रवास करून नोकरी सांभाळली. प्रामाणिकपणे नोकरीची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी वेळेचे बंधन न चुकता पाळले. यामुळे त्यांची पदोन्नती क्लार्क पदावर झाली. काम हेच आपले कर्म हा मंत्र जोपासल्यामुळे आज ते कॅशिअर या पदावर कार्यरत आहेत.
नोकरीला जाताना सायकलवरून प्रवास असला तरी सांगली, मिरज, इचलकरंजी, हातकणंगले येथे एकट्याने प्रवास करावयचा असल्यास आजही ते सायकलवरून जातात. यामुळे उंचीने सहा फुटापेक्षा अधिक असणाऱ्या कदम यांचे वजन ६४ किलो आहे. कोणतीही व्याधी नाही, आयुष्यात एक गोळी घेतली नाही. बाहेरचे खाणे नाही, पावसाळ्यामध्ये कामावर जाताना कधी रेनकोट नाही, हिवाळ्यात कधी स्वेटर नाही यामुळे श्वसन प्रक्रिया शंभर टक्के सुरळीत आहे.
--------------
धावपळीच्या जगात बहुतांश जण शरीराकडे दूर्लक्ष करतात. भौतिक सुविधांचा वापर करत असताना व्यायामाकडे दूर्लक्ष झाल्यामुळे अनेक व्याधी जडतात. शरीर सदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तास सायकलचा वापर केला पाहिजे. खास करून युवकांनी सायकलचा वापर दररोज करावा.
-सुनील कदम

फोटो ओळ-
फोटो -ich-shi2955jpgने पाठविला आहे