लायन्स क्लब, डॉक्टरांकडून मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लायन्स क्लब, डॉक्टरांकडून मदत
लायन्स क्लब, डॉक्टरांकडून मदत

लायन्स क्लब, डॉक्टरांकडून मदत

sakal_logo
By

ich-shi456jpg
शिरोळ ः सीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मदत देताना लायन्स क्लबचे पदाधिकारी.
---------------
लायन्स क्लब, डॉक्टरांकडून मदत
शहराची सुरक्षितता; शिरोळमध्ये लोकसहभागातून सीसीसीटीव्ही कॅमेरे
शिरोळ, ता. ४ ः शहरात लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या उपक्रमास लायन्स क्लब व शिरोळ डॉक्टर असोसिएशनतर्फे प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची मदत दिली. याबद्दल पोलिस व पत्रकार संघातर्फे लायन्स क्लब व डॉक्टर्स असोसिएशनचे आभार मानले.
शहरात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लोकसभागातून बसवण्याच्या उपक्रमास लायन्स क्लब व शिरोळ डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. शहराच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग होणार आहे. ही बाब महत्त्वाची असल्याने लोकांचा सहभाग वाढत आहे.
पत्रकार संघाच्या पुढाकाराने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. गुन्हेगारीला चाप बसण्यासाठी तसेच अपघाताबाबत शोध मोहीम घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे आहेत, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी केले.
लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन माळी, किशोर पाटील महेश मोरे, सुनील देशमुख, डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वीरश्री पाटील, डॉ. अतुल पाटील, डॉ. अमेय माने, डॉ. महेश बन्ने डॉ. सतीश कुंभार आदी उपस्थित होते.