शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देण्याची जबाबदारी

शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देण्याची जबाबदारी

शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देण्याची जबाबदारी
---
डॉ. लॉरी वॉकर; शिरोळला क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची पाहणी
शिरोळ, ता. ८ ः शेती करीत असताना शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. मिशिगन विद्यापीठ (अमेरिका), सोमय्या विद्याविहार विद्यापीठ (मुंबई) आणि श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक उपयोगी उपाययोजना आणि सहकार्य करता येईल. भविष्यात सामंजस्य करार होईल. त्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना नक्की होईल, असे मत मिशिगन विद्यापीठ अमेरिकेचे कृषी अभियंता डॉ. लॉरी वॉकर यांनी व्यक्त केले.
दत्त कारखान्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची पाहणी व अभ्यास दौऱ्यावेळी ते कारखाना कार्यस्थळावर बोलत होते. दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यापंडित गणपतराव पाटील यांनी स्वागत करून सर्वांचा सत्कार केला. कार्यक्षेत्रातील आतापर्यंत झालेल्या क्षारपड मुक्तीच्या कामाचा आढावा घेतला. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी प्रोजेक्टरद्वारे योजनेची माहिती दिली.
सोमय्या विद्याविहार विद्यापीठ, मुंबईच्या सूक्ष्म जीवशास्त्रमधील संचालिका डॉ. पार्वती जे. आर. यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजावून घेऊन संवाद साधण्याच्या उद्देशाने अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. शेडशाळ येथे महिलांनी स्थापन केलेल्या बीज बँकेची पाहणी करून सध्या बीज बँक तयार करण्याचे काम छोटे वाटत असले तरी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी हे महत्त्वाचे असल्याचे डॉ. वॉकर यांनी सांगितले.
अभ्यास दौऱ्यात त्यांनी शेडशाळ, घालवाड, शिरोळ येथे सुरू असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देऊन तांत्रिक बाजू समजावून घेतल्या. अभ्यास दौऱ्यात मिशिगन विद्यापीठाचे (अमेरिका) विस्तार विभागप्रमुख नईम एडवर्ड, सोमय्या कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. ए. डी. कडलग, कृषी संशोधन केंद्राचे (कसबे डिग्रज) प्रभारी अधिकारी डॉ. एम. पी. देशमुख, इरिगेशन व ड्रेनेज अभियंता डॉ. एस. डी. राठोड, असोसिएट प्रोफेसर सॉईल सायन्स डॉ. आर. बी. पवार, डॉ. एस. डी. काळे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com