शिरोळ उपनगराध्यक्षपदी जयश्री धर्माधिकारी व स्वीकृत नगरसेवक पदी उत्तम माळी यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोळ उपनगराध्यक्षपदी जयश्री धर्माधिकारी व स्वीकृत नगरसेवक पदी उत्तम माळी यांची निवड
शिरोळ उपनगराध्यक्षपदी जयश्री धर्माधिकारी व स्वीकृत नगरसेवक पदी उत्तम माळी यांची निवड

शिरोळ उपनगराध्यक्षपदी जयश्री धर्माधिकारी व स्वीकृत नगरसेवक पदी उत्तम माळी यांची निवड

sakal_logo
By

80814
80815

शिरोळ उपनगराध्यक्षपदी जयश्री धर्माधिकारी
स्वीकृत नगरसेवकपदी ‘स्वाभिमानी’चे उत्तम माळी बिनविरोध
शिरोळ, ता. ६ ः येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजर्षी शाहू आघाडीच्या नगरसेविका श्रीमती जयश्री धर्माधिकारी यांची, तर स्वीकृत नगरसेवकपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उत्तम बाबासो माळी यांची बिनविरोध निवड केली.
येथील नगरपरिषदेच्या भाई दिनकररावजी यादव सभागृहात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. उपनगराध्यक्षा सुरेखा पुजारी व स्वीकृत नगरसेवक प्रदीप चव्हाण यांनी आघाडीअंतर्गत ठरल्याप्रमाणे पदाचे राजीनामे दिले होते. उपनगराध्यक्ष पदासाठी श्रीमती जयश्री धर्माधिकारी व स्वीकृत नगरसेवक पदासाठी उत्तम माळी यांच्या नावावर नेत्यांनी एकमत केले. यामुळे धर्माधिकारी व माळी यांनी अर्ज दाखल केले. सभाध्यक्ष तथा नगराध्यक्ष पाटील यांनी धर्माधिकारी व माळी हे बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी प्रशासनातर्फे दोघांना शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक प्रकाश गावडे, तातोबा पाटील, राजेंद्र माने, योगेश पुजारी, डॉ. अरविंद माने, श्रीवर्धन माने-देशमुख, कुमुदनी कांबळे, कमलाबाई शिंदे आदी उपस्थित होते. पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे, प्रकाश माळी, धनाजी पाटील-नरदेकर उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.

फोटो ओळ-ich-shi641jpg ने पाठविला आहे
फोटो ओळ-ich-shi642jpg ने पाठविला आहे