घालवाडचे मैदान माऊली जमदाडेने मारले

घालवाडचे मैदान माऊली जमदाडेने मारले

82548
घालवाड ः येथे झालेल्या कुस्ती मैदानात माऊली जमदाडे व पैलवान बाला रफिक शेख यांच्यातील रंगतदार क्षण.

घालवाडचे मैदान जमदाडेने मारले
बाळू अपराध, जगताप, गुलफाम मुजावर विजयी

शिरटी, ता. १३ ः घालवाड (ता. शिरोळ) येथे झालेल्या कुस्ती मैदानात महान भारत केसरी माऊली जमदाडे याने आमदार चषक पटकावला. प्रथम क्रमांकाच्या या कुस्तीत महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख जखमी झाला. त्यामुळे गुणावर घेण्यात आलेल्या कुस्तीमध्ये जमदाडेने एका गुणाने विजय मिळवला. जिल्हा व राष्ट्रीय शहर तालीम संघाच्या मान्यतेने हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत मैदान झाले.
जमदाडेविरोधातील लढतीत शेख याच्या हाताला दुखापत झाली. यामुळे पंचांनी कुस्तीशौकिनांच्या आग्रहामुळे गुणांवर कुस्ती घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जमदाडेने बालावर एका गुणांनी मात केली. मैदानामध्ये लहान-मोठ्या ९० कुस्त्या झाल्या. परिसरातील नवोदित पैलवानांनी चटकदार कुस्त्या केल्या. त्याला कुस्तीशौकिनांनी जल्लोषी साथ दिली. दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत बाळू अपराध याने विजय मिळविला. तिसऱ्या लढतीत प्रशांत जगतापने बाबा रानगेविरुद्ध विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत गुलफाम मुजावरने रविकुमारवर विजय मिळविला. पाचव्या लढतीत सागर पवारला श्रीमंत भोसले याने पराभूत केले. सहाव्या क्रमांकासाठी हिमांशू रॉयवर तुषार जगतापने मात केली.
मैदानाचे उद्‍घाटन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले. पैलवान अमृता भोसले, रावसाहेब देसाई, तानाजी यमगर, मस्जिद अत्तार, शिवाजी थोरवत पंच होते. पैलवान जोतिराम वाजे, जयसिंग खोंद्रे यांनी समालोचन केले. जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन बी. ए. पाटील, डॉ. व्यंकटेश पत्की, डॉ. प्रवीण जैन, माजी सरपंच विकास पाटील, गजानन मगदूम, पैलवान रवींद्र पाटील उपस्थित होते.
०००००००००००००००००
फोटो ओळ-
पैलवान माऊली जमदाडे व पैलवान बाला रफिक शेख यांच्यातील रंगतदार क्षण.
फोटो ich-shi1340jpg ने पाठविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com