
सहकार चळवळ रुजवण्यात ‘दत्त’च योगदान
84820
शिरोळ ः क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाच्या प्रारंभप्रसंगी आमदार बाळासाहेब पाटील व मान्यवर.
------------
सहकार चळवळ रुजवण्यात ‘दत्त’च योगदान
बाळासाहेब पाटील; २५० एकर जमीन सुधारणा कामाचा प्रारंभ
शिरोळ, ता. २३ ः देशाला सहकाराच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. यामध्ये सहकारी साखर कारखाने अग्रभागी होते. सहकार चळवळ रुजवण्यामध्ये दत्त साखर कारखान्याचे योगदान मोठे असुन गणपतराव पाटील यांनी सुरु केलेल्या जमीन क्षारपड मुक्त प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्रस्तरावर अनुदान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.
येथील माऊली दत्तगुरु क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प संस्थेमार्फत २५० एकर जमीन सुधारणा कामाच्या चौथ्या टप्प्याच्या कामाचा प्रारंभ आमदार बाळासाहेब पाटील व दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील आणि मान्यवरांच्याहस्ते केला. यावेळी ते बोलत होते.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातील जुन्या पाणीपुरवठा संस्थांना पुनर्जीवित करण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी बाळासाहेब पाटील यांनी प्रयत्न करावेत व पाठपुरावा करावा, असे आवाहन केले. माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील शेतामध्ये अतिरिक्त पाणी मोठ्या प्रमाणात झाले असून जलमुक्त जमीन करण्यासाठी गणपतराव पाटील यांनी अथक प्रयत्न करून साडेसात हजार एकर जमीन क्षारमुक्त केल्याचे काम उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
गणपतराव पाटील यांनी क्षारपड जमीन सुधारणा कामाचा आढावा घेऊन केंद्र व राज्य सरकारकडून याकमी अनुदान मिळवण्यासाठी बाळासाहेब पाटील यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत नगरसेवक पंडित काळे यांनी केले. सूत्रसंचालन दगडू माने यांनी केले. आभार चंद्रकांत भाट यांनी मानले. दत्त कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, इंद्रजित पाटील, प्रमोद पाटील, भैय्यासो पाटील, दरगू गावडे, संचालिका विनया घोरपडे, यशोदा कोळी, संगीता पाटील कोथळीकर, कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील, प्रताप उर्फ बाबा पाटील, प्रकल्प अध्यक्ष उदय संकपाळ, बाळासो कोळी आदी उपस्थित होते.
फोटो ich-shi2241jpg ने पाठविला आहे