
शिरोळला महिलांसाठी प्रशिक्षण
शिरोळला महिलांसाठी प्रशिक्षण
शिरोळ, ता. २३ ः शिरोळ नगरपरिषदेकडून महिलांचे सबलीकरण करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या मुली व महिलांनी सोमवारी (ता. २७) नाव नोंदवावे, असे आवाहन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले आहे.
शिबिराबाबत माहिती देताना मुख्याधिकारी अभिजित हराळे म्हणाले, ‘महिला सबलीकरणाच्या दृष्टीने शिरोळ नगरपरिषदेकडून मुली व महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून दिले जाणार आहे. मोमोज चायनीज, थ्रीडी इफेक्ट केक, ज्वेलरी डिझाईन असे विविध प्रकारचे व्यवसायाचे प्रशिक्षण मुली व महिलांना दिले जाणार आहे. सोमवारी हनुमान मंदिर, गावडे गल्ली येथे दुपारी बारा वाजता नानोंदणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. यानंतर सलग पंधरा दिवसांचे प्रशिक्षण संबंधितांना दिले जाणार आहे. मर्यादित जागा असल्याने प्रथम नाव नोंदवणाऱ्यांना प्राधान्याने शिबिरात सहभागी होता येणार आहे. याचा लाभ शिरोळ नगरपरिषद हद्दीतील मुली व महिलांनी घ्यावा.’