जांभळी येथे झालेल्या अपघातात 19 वर्षाचा युवक ठार

जांभळी येथे झालेल्या अपघातात 19 वर्षाचा युवक ठार

85495
...
मोटारसायकलच्या धडकेत
जांभळीत बारावीचा विद्यार्थी ठार

जेवल्यानंतर शतपावली करत असताना दुर्घटना

शिरोळ ता २६ ः जेवल्यानंतर शतपावली करत असताना जांभळी (ता. शिरोळ) येथील बारावीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी भरधाव मोटारसायकलच्या धडकेत ठार झाला. तेजस शिवराज जाधव असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
जांभळी येथील तेजस शिवराज जाधव व वृषभ अण्णासो पाटील हे जेवल्यानंतर शनिवारी रात्री यड्रावच्या दिशेने साईडपट्टीवरून चालत जात होते. यावेळी भरधाव मोटरसायकलवरून दोन युवक जात होते. या मोटारसायकलस्वारांनी तेजस जाधव याला जोरदार धडक दिल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या चरीमध्ये तेजस उडून पडल्याने डोक्यास व शरीरास गंभीर जखम झाली. त्याला सुरुवातीला खासगी रुग्णालयात व नंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातानंतर मोटारसायकल चालक प्रणव गुजरे (रा. हरोली) हा न थांबता घटनास्थळावरून पसार झाला आहे.
तेजस हा बारावीमध्ये शिकत होता. त्याने नुकतेच तीन पेपर दिले होते. आई-वडिलांना तो एकुलता एक होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला असला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com