शिरोळला पाण्यासाठी भटकंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोळला पाण्यासाठी भटकंती
शिरोळला पाण्यासाठी भटकंती

शिरोळला पाण्यासाठी भटकंती

sakal_logo
By

शिरोळला पाण्यासाठी भटकंती
शिरोळ, ता. १० ः घालवाड येथील कृष्णा नदी पात्रात असलेल्या इंटकमध्ये पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
शहरासाठी घालवाड येथील कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या इंटकमध्ये पाण्याचा फ्लो थांबला आहे. तसेच नदीपात्रातून पाणी उपसा इंटकमध्ये असलेली विद्युत मोटार नादुरुस्त झाली आहे. ती दुरुस्तीस विलंब होत आहे. नदीपात्रातून पाणी उपसा करून तो इंटकमध्ये सोडण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा नगरपरिषदेकडे नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गैरसोय होत आहे. इंटकमध्ये पाणी येत नसल्याने चार दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
दरम्यान, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी आरोप्लांटचा आधार घ्यावा लागत आहे. पाच रुपयाला वीस लिटर पाणी यापूर्वी मिळत होते. मात्र उन्हाळा सुरू झाल्याने खासगी आरोप्लांटधारकांनी दहा रुपयाला वीस लिटर पाणी अशी दरवाढ केली आहे. कृष्णा नदीपात्रात धरणातून पाणी सोडावे, तसेच नगरपरिषद प्रशासनाने नादुरुस्त झालेली विद्युत मोटार तत्काळ दुरुस्त करावी व पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.