
शिरोळला एप्रिलमध्ये हरिनाम सप्ताह
शिरोळला एप्रिलमध्ये हरिनाम सप्ताह
शिरोळ, ता. १६ ः श्रीगुरू बाबासाहेब आजरेकर ज्ञानवंश सांप्रदाय शिरोळ यांच्यावतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ११ ते १८ एप्रिलदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. सप्ताहामध्ये राष्ट्रीय स्तरावरील नामवंत कीर्तनकार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, नामवंत प्रवचनकार, राष्ट्रीय दर्जाचे संगीतकार, सुगमगायन, भारुड, मृदंग, सोलोवादक यांच्यासह मान्यवरांचे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा समितीचे अध्यक्ष, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, कार्याध्यक्ष दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, स्वागतध्यक्ष डॉ. अशोकराव माने, मार्केट कमिटीचे अध्यक्ष सुभाषसिंग रजपूत हे महासचिव तर माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद लडगे यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. अन्य कार्यकर्त्यांची समिती स्थापन केली आहे. अखंड हरिनाम सप्ताहाची जय्यत सुरू आहे.