Fri, June 9, 2023

गैरसमजुरीतून मारहाण केले प्रकरणी टाकवडे येथील तिघावर गुन्हा दाखल
गैरसमजुरीतून मारहाण केले प्रकरणी टाकवडे येथील तिघावर गुन्हा दाखल
Published on : 29 March 2023, 6:24 am
गैरसमजुरीतून मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
शिरोळ ः टाकवडे (ता.शिरोळ) येथील अन्नासो धोंडीराम वडर हे, रंजना वडर यांच्या घरात पाणी मागण्यासाठी गेले असता अण्णासो वडर हे घरात चोरी करण्यास गेले आहेत असा गैरसमज करून घेऊन संगनमत करून लथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी प्रकाश मारुती वडर, किरण लक्ष्मण वडर, शालाबाई लक्ष्मण वडर (सर्व रा. टाकवडे, ता.शिरोळ) यांच्यावर शिरोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अन्नासो वडर यांनी इचलकरंजी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन घरी परत आल्यानंतर त्यांनी शिरोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार एस.आर.पाटील करीत आहेत.