
बाजार समितीसाठी बिनविरोधसाठी प्रयत्न केले
बाजार समितीसाठी बिनविरोधसाठी प्रयत्न केले
अनिलराव यादव; शिरोळमध्ये नुतन संचालक, विविध स्पर्धेतील यशस्वितांचा सत्कार
शिरोळ, ता. ३ ः बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. पण काहिंनी मुद्दाम निवडणूक लावली. तथापी सर्वपक्षीय राजर्षी शाहू शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. हे सर्व नूतन संचालक बाजार समितीच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, असा विश्वास शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते व दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी व्यक्त केला.
बाजार समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवार आणि विविध स्पर्धेत व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार भारतीय जनता पार्टी व यादव प्रेमी ग्रुपतर्फे केला. यावेळी ते बोलत होते.
शिरोळची कन्या पैलवान अमृता पुजारी हिने राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावल्याबद्दल तसेच पवित्रा सुनील माने हिने राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल तसेच पाच जिल्ह्यातील उत्कृष्ट क्षेत्रीय अधिकारी व वनरक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रुकेश मुल्लाणी कुस्ती प्रशिक्षक व मुरगुडचे माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर यांचा आणि बाजार समितीचे नूतन संचालक शिवाजी चव्हाण, विजयसिंह माने देशमुख, रामदास गावडे, सुभाषसिंग रजपूत यांचा सत्कार केला.
ज्येष्ठ नागरिक संघटनेचे माजी अध्यक्ष बजरंग काळे, जयसिंगपूर बाजार समितीचे माजी सभापती सुभाषसिंग रजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. विराज यादव, नगरसेवक राजाराम कोळी, इम्रान अत्तार आदी उपस्थित होते. भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी स्वागत केले. नगरसेवक पंडित काळे यांनी आभार मानले.