Wed, October 4, 2023

शिरटी ग्रामपंचायतीतर्फे नुकसान भरपाईची मागणी
शिरटी ग्रामपंचायतीतर्फे नुकसान भरपाईची मागणी
Published on : 10 May 2023, 3:30 am
शिरटी ग्रामपंचायतीतर्फे
नुकसान भरपाईची मागणी
शिरोळ ः मौजे शिरटी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिरटी ग्रामपंचायतीतर्फे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन शिरोळ तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. निवेदनावर सरपंच हसीना मुल्लाणी, पोलिस पाटील मोहन बन्ने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना निवेदन दिले. उपसरपंच प्रकाश माळी, राहुल सूर्यवंशी, सागर पवार, सतीश चौगुले आदी उपस्थित होते.