बाळासो बन्ने यांचा शुक्रवारी शिरोळला सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासो बन्ने यांचा शुक्रवारी शिरोळला सन्मान
बाळासो बन्ने यांचा शुक्रवारी शिरोळला सन्मान

बाळासो बन्ने यांचा शुक्रवारी शिरोळला सन्मान

sakal_logo
By

बाळासो बन्ने यांचा
शुक्रवारी शिरोळला सन्मान
शिरोळ, ता. २९ ः येथील राजर्षी शाहू नगर वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त बाळासो बन्ने यांना २०२३-२४ च्या शाहू ग्रंथ मित्र पुरस्काराने शुक्रवारी (ता. २) सायंकाळी सहा वाजता सन्मानित करण्यात येणार आहे.
वाचनालयाचे अध्यक्ष आण्णासाहेब माने गावडे पुरस्काराबाबत माहिती देताना म्हणाले, ‘बाळासो बन्ने यांचा सत्कार श्री. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते व नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संजय गांधी निराधार योजना समिती तासगावचे अध्यक्ष डी. ए. माने यांचे ‘हे विसरून चालेल का?’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमाला माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, श्री. दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक बाबा उर्फ प्रतापराव पाटील, दत्त साखर कारखान्याचे तज्ञ संचालक दरगू गावडे, उपनगराध्यक्ष सौ. कुमुदिनी कांबळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिरोळमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.’