दत्त पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्र

दत्त पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्र

दत्त पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्र
शिरोळ, ता. २ ः येथील श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र शासनाचे सुविधा केंद्र (एफ. सी.) सुरू केले आहे, अशी माहिती श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील आणि सुविधा केंद्राचे समन्वयक ए. ई. पाटील यांनी दिली.
यावर्षी दहावीच्या निकालापूर्वीच अभियांत्रिकी डिप्लोमा (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी दहावीच्या गुणपत्रिकेची ऑनलाइन प्रिंट व विद्यार्थी स्वत: अथवा पालक सुविधा केंद्रावर प्रवेश अर्ज भरू शकतो. कागदपत्रांची छाननीही करू शकतो. सुविधा केंद्रावर विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन व अर्ज भरून देण्याची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निकमधील सुविधा केंद्रास भेट देऊन अर्ज दाखल करण्याचे आवाहन ट्रस्टचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील आणि डायरेक्टर ए. एम. नानीवडेकर, प्राचार्य पी. आर. पाटील यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com