शिरोली : यात्रा लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोली : यात्रा लेख
शिरोली : यात्रा लेख

शिरोली : यात्रा लेख

sakal_logo
By

शिरोली विकासाच्या नव्या वळणावर
सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामे मार्गी


शिरोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे गेल्या साडेचार वर्षात मार्गी लागली आहेत. तलाव सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. पाणी योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन यशस्वीपणे सांभाळली आहे. लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे व उपसरपंच सुरेश यादव यांनी शिरोली गावाला विकासाच्या नव्या वळणावर नेले आहे. हातकणंगले येथील काशिलिंग बिरदेव यात्रा, अहमदसो व पिर बालेचाँदसो उरूसानिमित्त शिरोली पुलाची ग्रामपंचायतीने गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा !
- प्रतिनिधी, शिरोली पुलाची

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून शिरोलीची ओळख आहे. औद्योगिक वसाहतीमुळे शिरोलीची कागदोपत्री लोकसंख्या सुमारे 30 हजार असली तरी प्रत्यक्षात 80 हजाराहून अधिक लोक वास्तव्यास आहेत. यामुळे मूळ गावाच्या सभोवती अनेक वाढीव वसाहती वसल्या आहेत. या वाढीव वसाहतींना प्राथमिक सोयी सुविधा देण्याचे काम करताना शिरोली ग्रामपंचायतीला तारेवरची कसरत करावी लागते. अशा परिस्थितीमध्ये गेल्या साडेचार वर्षात शिरोली ग्रामपंचायतीचा कारभार शाहू आघाडीने हाती घेतल्यानंतर विकासाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत.
लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांनी सरपंच म्हणून कारभार हाती घेताच पुरातन हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न हाती घेतला आणि लोकवर्गणीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले. आता मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निधीतून संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या देखरेखेखाली आले आहे. ग्रामपंचायतीने महिला रोजगार योजना, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा विकास, वाढीव पाणीपुरवठा योजना, पाणी टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर, सार्वजनिक आरोग्यासाठी रुग्णवाहिका, घनकचरा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टर ट्रॉली असे विविध मोठे प्रकल्प गेल्या साडेचार वर्षात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण केले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात शिरोलीकरांना दिलेल्या सर्व विकासकामाची आश्वासने पूर्णत्वास आली असून, सुमारे पंचवीस कोटीहून अधिक रुपयांची विकासकामे सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करता आली याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. भोगण यांनी सांगितले.

चौकट
महिलांना रोजगारासाठी संधी
महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन महिलांनी स्वावलंबी बनावे यासाठी ग्रामपंचायतीच्या जागेत व्यवसाय करण्यासाठी गाळे दिले आहेत. तसेच व्यवसाय, फॅशन डिझाइनिंग, पाककला प्रशिक्षण अशा विविध प्रशिक्षणाचे आयोजन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले. शिरोली गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी, ठिबक सिंचन, शेतीतील बदलते तंत्रज्ञान, आधुनिक शेतीची पद्धत, पशुपालक शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने शिरोली ग्रामपंचायतीने सुमारे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. यामध्ये राहुरी येथील कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.

चौकट
खेळ व खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन
सरपंच शशिकांत खवरे यांनी खेळ व खेळाडू यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. कबड्डीचा सरपंचाच्या चषकाचे यशस्वी आयोजन केले. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये फुटबॉल खेळ रुजावा, वाढावा आणि चांगले उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू तयार व्हावेत, यासाठी सरपंच खवरे सतत प्रयत्नशील असतात. त्यांनी ग्रामीण भागातील फूटबॉल संघांसाठी सरपंच चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Srp22b02034 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top