शिरोली : ‘सीएसआर’ निधीच्या माहितीसाठी महाअनुषा संगणकप्रणाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोली : ‘सीएसआर’ निधीच्या माहितीसाठी महाअनुषा संगणकप्रणाली
शिरोली : ‘सीएसआर’ निधीच्या माहितीसाठी महाअनुषा संगणकप्रणाली

शिरोली : ‘सीएसआर’ निधीच्या माहितीसाठी महाअनुषा संगणकप्रणाली

sakal_logo
By

‘सीएसआर’ निधी प्रक्रियेत येणार पारदर्शकता
माहिती मिळण्यासाठी महाअनुषा संगणकप्रणाली विकसित
युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. १०: कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) मिळालेला व खर्च झालेला निधी, शिल्लक निधी याची माहिती मिळण्यासाठी तसेच सीएसआरसाठी पात्र असलेल्या कंपन्या त्यांचा सीएसआर निधी कुठे खर्च करू शकतात याबाबतची माहिती मिळण्यासाठी महाअनुषा संगणकप्रणाली विकसित केली आहे. यामुळे सीएसआर निधी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. ही प्रणाली पुणे महसूल विभागातील पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतही राबविली जाणार आहे.
खासगी क्षेत्रातील कंपन्याकडून निसर्गातील साधन संपत्तीचा वापर करून नफा मिळवला जातो. त्याबदल्यात परतफेड करण्याची जबाबदारी असावी म्हणून सीएसआरची तरतूद केली. कंपनी कायदा २०१३ कलम १३५ नुसार सीएसआर निधी संकलित करणे बंधनकारक आहे. औद्योगिक वसाहती, विविध कंपन्यांकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्यात येत असल्याची एकत्रित नोंद कुठेच होत नाही. त्यामुळे आतापर्यंत शासकीय यंत्रणांना सीएसआर निधी उपलब्ध झाला. मात्र, त्याचा हिब ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही.
कर्नाटकने ‘आकांशा’ नावाने संगणकप्रणाली विकसित करत सीएसआर निधीचे व्यवस्थापन केले. त्याच धर्तीवर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मदतीने महाअनुषा प्रणाली विकसित केली आहे. पुणे जिल्ह्यात जानेवारीपासून ही संगणकप्रणाली सुरू असून, यशस्वी झाली आहे. त्यामुळे महाअनुषा पोर्टलचा पुणे महसूल विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांत विस्तार केला जाणार आहे. पाचही महापालिकांना यात सामावून घेतले जाणार आहे.
शासकीय विविध विभाग, स्वयंसेवी संस्था व उद्योगसमूहसह सामान्य नागरिकांना या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे. सीएसआर निधीतून जे प्रकल्प उभे करायचे असतील ते या संकेतस्थळावर अपलोड केले जातील. जे उद्योगसमूह त्यांचा सीएसआर निधी या प्रकल्पासाठी देणार आहेत, त्या उद्योगसमूहांना ही प्रक्रिया संकेतस्थळाच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. ज्या प्रकल्पासाठी उद्योगसमूहाने निधी दिला त्या प्रकल्पांच्या प्रत्येक टप्प्याचे संपूर्ण परीक्षण करता येणार आहे.
-
कोट
‘सीएसआर’ निधीच्या माहितीसाठी तयार केलेली महाअनुषा संगणकप्रणाली फायदेशीर आहे. यामुळे सामाजिक कार्य आणि सीएसआर निधी याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
-डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार

Web Title: Todays Latest Marathi News Srp22b02086 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top