शिरोली : महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये क्रीडा विषय अनिवार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोली : महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये क्रीडा विषय अनिवार्य
शिरोली : महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये क्रीडा विषय अनिवार्य

शिरोली : महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये क्रीडा विषय अनिवार्य

sakal_logo
By

महाविद्यालये, विद्यापीठांत क्रीडा विषय अनिवार्य
विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश; येत्या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. २१ : शाळांमध्ये अनिवार्य असणाऱ्या क्रीडा विषय आता महाविद्यालये आणि विद्यापीठांतही अनिवार्य करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेत. येत्या शैक्षणिक सत्रापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) उच्चस्तरीय समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या शिफारशींनुसार शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा, विद्यार्थी आरोग्य, कल्याण, मानसिक आणि भावनिक आरोग्य यावर आधारित मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेत. यामध्ये देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती आणि भावनिक आरोग्याची काळजी घ्यावी, असे निर्देश यूजीसीकडून दिलेत. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य समुपदेशकांसोबतच आरोग्यतज्ज्ञ बंधनकारक केला आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक व्यक्तीने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीशिवाय भावनिक पैलूंकडेही लक्ष दिले असे निरीक्षण यूजीसीने नोंदवले आहे. मात्र तरुण पिढी अजूनही डिजिटल उपकरणात हरवलेली आहे. अशा परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसोबतच तरुणांनी त्यांच्या भावनिक आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
शाळांमध्ये क्रीडा हा अनिवार्य विषय होता. पण, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये हा पर्यायी विषय आहे. मात्र, नव्या निर्देशानुसार क्रीडा विषय सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचा केला आहे. यानुसार सर्व विद्यार्थी कॅम्पस जीवनात विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील. खेळासह अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासह तणाव दूर होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

चौकट
दर तीन महिन्यांनी क्रीडा स्पर्धा
यूजीसीने उच्च शैक्षणिक संस्थांना फिटनेस प्लान पाठविला आहे. यामध्ये शाळांच्या धर्तीवर प्रत्येकाला एक तासाचा खेळाचा कालावधी बंधनकारक आहे. यामध्ये स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी, योगा, सायकलिंगचा पर्याय आहे. शिवाय, नृत्य, पारंपरिक विषयांच्या माध्यमातून फिटनेसवर भर दिला आहे. दर तीन महिन्यांनी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

कोट
विद्यापीठ अनुदान आयोगाने क्रीडा विषय सक्तीचा करण्याबाबत दिलेले निर्देशाचे स्वागत आहे. यामुळे तरुण पिढी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त राहील.
-प्रा. दिपक पाटील, एनआयएस प्रशिक्षक कबड्डी

Web Title: Todays Latest Marathi News Srp22b02094 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..