शिवरायांच्या पुतळ्यासाठी ४० लाख देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवरायांच्या पुतळ्यासाठी ४० लाख देणार
शिवरायांच्या पुतळ्यासाठी ४० लाख देणार

शिवरायांच्या पुतळ्यासाठी ४० लाख देणार

sakal_logo
By

02574
अंबप : येथे अशोकराव माने स्पोर्टस् व अंबप प्रीमीयर लीग आयोजित स्पर्धेतील विजेता जय मल्हार स्पोर्ट संघास बक्षीस देताना खासदार धैर्यशील माने, विजयसिंह माने, विकासराव माने, राजेंद्र माने, विश्वनाथ पाटील, सागर पाटील, सतीश मोरे, लखन दाभाडे आदी.
-----
शिवरायांच्या पुतळ्यासाठी ४० लाख देणार
खासदार धैर्यशील माने; अंबपमध्ये क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
टोप, ता. ८ : अंबप (ता. हातकणंगले) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभाण्यासाठी व पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी चाळीस लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा खासदार धैर्यशील माने यांनी केली.
अंबप येथे अंबप प्रीमियर लीग व अशोकराव माने स्पोर्टस्‌तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने होते. पंचायत समितीचे माजी सदस्य विकासराव माने प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धेत जय मल्हार स्पोर्टस् अंबप विजेतेपद तर राजमंगल स्पोर्टस् पाडळी संघाने उपविजेतेपद पटकावले. विजयसिंह माने म्हणाले, ‘जिल्हा परिषद मतदारसंघात गटा तटाचे राजकारण न करता रचनात्मक विकासकामे केली. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे. आपल्या सर्वांचे स्फूर्तीस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मानस असून, त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी निधी द्यावा.’ सरपंच बी. एस. अंबपकर, राजेंद्र माने, प्रसाद पाटील, विश्वनाथ पाटील, संपत कांबळे, सागर पाटील, सतीश मोरे, प्रकाश कुंभार, असिफ मुल्ला, सुनील माने, प्रशांत पाटील उपस्थित होते. आभार विश्वनाथ पाटील यांनी मानले.