राज्यात बालकामगारांच्या पुनर्वसन प्रमाणात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात बालकामगारांच्या पुनर्वसन प्रमाणात घट
राज्यात बालकामगारांच्या पुनर्वसन प्रमाणात घट

राज्यात बालकामगारांच्या पुनर्वसन प्रमाणात घट

sakal_logo
By

राज्यात बालकामगारांच्या
पुनर्वसन प्रमाणात घट
युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. १५ : राष्ट्रीय बाल श्रमिक योजनेअंतर्गत (एनसीएलपी) राज्यात गेल्या दोन वर्षांत कामावरून सुटका केल्यानंतर पुनर्वसनासाठी आणलेल्या बाल कामगारांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोना व तत्सम कारणांमुळे ही संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येते. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय बाल श्रमिक योजनेतील बालकांच्या राज्यातील नोंदणीनुसार २०१९-२० या वर्षांत पुनर्वसनासाठी आलेल्या मुलांची संख्या नऊ हजार ३३७ होती. २०२०-२१ मध्ये २०३१ आणि २०२२ (जुलैपर्यंत) २११० इतकी कमी झाली होती.
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयातर्फे ९ ते १४ वर्षे वयोगटांतील बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय बाल श्रमिक योजना राबवण्यात येते. आर्थिक परिस्थिती किंवा अन्य काही कारणांमुळे लहान मुलांना कामाला जुंपले जाते. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने २०१७ मध्ये एनसीएलपी ही योजना सुरू केली. याअंतर्गत बाल कामगारांची सुटका करण्यात येते. तसेच त्याचे पुनर्वसन व शिक्षणासाठी एनसीएलपीच्या प्रशिक्षण केंद्रात त्याची नोंदणी केली जाते. तेथे त्याला शिक्षण, रोजगाराचे प्रशिक्षण देऊन पुनर्वसन केले जाते. 
ही योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन वर्षांत पुनर्वसन केंद्रात नोंदणी झालेल्या बाल कामगारांची संख्या लक्षणीय दिसून येते. योजनेच्या पहिल्या वर्षांत म्हणजे २०१७-१८ मध्ये पाच हजार २५०, २०१८-१९ मध्ये आठ हजार १२२ आणि २०१९-२०२० मध्ये नऊ हजार ३३७ होती. मात्र त्यानंतर कोरोना महामारी त्यामुळे लागू केलेला लॉकडाउन यामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाले. परिणामी बंद झालेले उद्योग व अन्य कामे यामुळे बाल कामगारांचे कामावर जाण्याचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळेच २०२०-२१ मध्ये २०३१ व २०२१-२२ (जुलैपर्यंत) २११० इतकी नोंदणी झालेल्या बाल कामगारांची संख्या आहे.
------------
कोट
राष्ट्रीय बाल श्रमिक योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या बाल कामगारांची संख्येचा फेर आढावा घेणे गरजेचे आहे. आजही राज्यात मोठ्या प्रमाणात बालकामगार कार्यरत असल्याचे दिसून येतात.
- अंजुम देसाई, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य असंघटीत क्षेत्र कामगार संघटना